Posted on Leave a comment

🏍 2020 नंतर ‘या’ वाहनांची विक्री होणार बंद – सुप्रीम कोर्ट


🚫 देशात बीएस-4 इंजिनाच्या वाहनांची विक्री आणि नोंदणी 1 एप्रिल 2020 पासून बंद करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

काय आहे बीएस-4 ?
बीएस-4 अर्थात भारत स्टेज-4 हे भारत सरकारद्वारे निश्चित करण्यात आलेले वाहनांमधील इंधनाचे एक उत्सर्जन मानक आहे. या उत्सर्जन मानकांमध्ये वाहनांमुळे होणाऱ्या वायू प्रदुषणाच्या प्रमाणाची निश्चित व्याख्या करण्यात आली आहे.

💨 वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी सरकार 2020 पर्यंत संपूर्ण देशात बीएस-6 मानक लागू करणार

Posted on Leave a comment

अनवाणी चालण्याचे भरपूर फायदे !


👣 _बऱ्याच जणांना आश्चर्य वाटेल पण अनवाणी पायाने चालण्याने पायाला खुप आराम मिळतो. जर तुम्ही बाहेर अनवाणी पायाने चालु शकत नसाल तर निदान घरातल्या घरात चप्पल घालु नका. अनवाणी पायाने चालल्याने फक्त एनर्जीच वाढत नाही, तर पाय मजबूतही होतात._

▪ अनवाणी पायी चालल्याने शरीरातील रक्त पुरवठा सुरळीत राहतो.

▪ कंबरदुखी सारख्या समस्या देखली यामुळे दुर होतात.

▪ पायदुखीवर आराम मिळवण्यासाठी अनवाणी चालणे फायदेशीर ठरते.

▪ अनवाणी चालल्याने डोके शांत राहते तसेच तणावही दुर होतो.